शिरूर – शिरूर (shirur) तालुक्यातील जांबूत गावात नागरिकांना त्रास आणि हुलकावली देणारा बिबट्या (Leopard) अखेर पिंजऱ्यात अडकला गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा (Leopard) वावर होता. त्यास रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांसह वनविभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला. या बिबट्याने अक्षरशः संपूर्ण परिसरात थैमान घातले होते आणि त्यामुळे बळीराजा आणि सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले होते. आणि अखेर हा बिबट्या (Leopard) पिंजऱ्यात अडकला आहे.

पुणे जिल्ह्यात पुणे-अहमदनगर रस्त्यावरील शिरूर तालुक्यात जांबूत गावात नागरिकांवर बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून घडत हाेते.

त्यानंतर वन विभागाने सदर बिबट्यास जेरबंद करण्यासाठी मागील १५ दिवसांपासून प्रयत्न करत त्यास शनिवारी पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. पूजा नरवडे या १९ वर्षीय तरुणीला घरासमाेरून बिबट्याने ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी घडला हाेता.

जांबूत येथील पूजा नरवडे ही तरुणी काही दिवसांपूर्वी घरासमाेर काम करत हाेती. त्या वेळी घराच्या परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप मारली.

त्यानंतर बिबट्याने तिचा गळा पकडल्याने तिला सुटका करणेही शक्य झाले नाही अथवा आरडाओरड करण्यास जमले नाही. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने मुलीस जवळच्या उसाच्या शेतात २०० फूट अंतरापर्यंत ओढत नेले.

दरम्यान, तिच्या घराजवळील काही लाेक मदतीसाठी धावल्यानंतर बिबट्याने तरुणीला साेडून धूम ठाेकली. परंतु या हल्ल्यात तरुणीच्या मानेवर खाेल जखमा हाेऊन माेठा रक्तस्राव झाल्याने ती जागीच गतप्राण झाली हाेती.

त्यानंतर स्थानिक गचवकऱ्यांनी आणि संबंधित परिवाराने वनविभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अतिशय शर्तीने सापळा रचून या हल्लेखोर बिबट्याला कैद केलं आहे.

पुणे जिल्हा परिसरात यापूर्वी देखील अनेक वेळा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून,शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दिवसाढवळ्या बिबट्या नागरिकांवर हल्ला करत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.