पुणे – अपघातांचे (Accident) हॉट स्पॉट असलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune express way) वेवरील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai Pune express way) महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रेमात वाढली असून, या अपघातांच्या संख्येत आणखी एक भर पडली आहे, नुकतंच या एक्स्प्रेसवे वर पहाटेच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात झाला (Accident News) आहे.

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अर्टिगा कारच्या (Ertiga Car) चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात (Accident News) घडला. या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. तर तिघे जखमी आहेत.

अर्टिगा कारचा अपघात इतका भीषण (Road Accident News) होता की धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारच्या समोरील बाजूस जबर फटका अपघातात बसला होता.

अर्टिगा कार ढेकू गावच्या हद्दीत किलोमीटर 37.00 याठिकाणी आली असता चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारची अज्ञात वाहनाला मागून धडक (Accident News) बसली.

धडक एवढी जबरदस्त होती की कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला किरकोळ जखमी झाली असून चार जण गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे (Accident News) सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये अब्दुल रहमान खान,३२ वर्षे, घाटकोपर ,अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी,

राहुल कुमार पांडे, वय-३० वर्षे, आशुतोष नवनाथ गांडेकर, २३ वर्षे, ५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई यांचा मृत्यू झाला आहे.

तर, दुसरीकडे मच्छिंद्र आंबोरे वय ३८ वर्ष, अमीरउल्ला चौधरी , दिपक खैराल, अस्फीया रईस चौधरी,हे जलख्मी झाले आहेत. अपघात (Accident News) झाला तेव्हा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळाल होत.

कारमधील हे सर्व प्रवासी हे अर्टिगा ह्या चारचाकी वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, जखमींना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालय येथे नेण्यात आले.

आणि त्यादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. सध्या चालक आणि इतर दोघाजणांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघाताची (Accident News) माहिती मिळताच लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.