मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात गुप्त भेट झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आणि अश्यातच ही भेट झाल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, या तर्कवितर्कं चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत: अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

“देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही’, असं खुद्द अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सांगितलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे राज्यात पुन्हा धुमाकूळ होणार का? असं बोललं जात आहे.

नेमकं अशोक चव्हाण काय? म्हणाले…

“माध्यमांद्वारे सुरु असलेले वृत्त चुकीचे आणि विपर्यास आहे. राज्यात गणेशोत्सव काळात पक्षीय मतभेद विसरुन नेतेमंडळी एकमेकांकडे जात असतात. पक्षाच्या पलिकडे सर्वांचे संबंध असतात.

माझी त्यांच्यासोबत थोडीच दुश्मनी आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.’ असे चव्हाण यांनी सांगितलं आहे.

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात काल भेट झाली. ही गुप्त भेट आता उघड झाली आहे. अशोक चव्हाण भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते.

तिथेच देवेंद्र फडणवीसही गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यात भेट झाली. तिथे त्यांच्यात काहीवेळ भेट झाली. असं सांगण्यात आलं आहे.