मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सामनाला (Samana) मुलाखत देताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ठरले होते. त्याअनुशंगाने ट्रेझरही आले.

मात्र, सामनाला मुलाखत म्हणजे सर्वकाही ठरवून अशीच एक भावना सर्वसामान्यांची झाली आहे. गेला महिनाभर बंडखोर आमदारांबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी जी भावना व्यक्त केली तीच मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

पक्षात झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे (Samana) व्यक्त झाले आहेत.

मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केल्याचं या मुलाखतीत पाहायला मिळालं.

दरम्यान, या मुलाखतीचा टीझर काल राऊत (sanjay raut) यांनी शेअर केल्यानंतर या टीझरवरुनच निलेश राणेंनी (Nilesh Rane) शिवसेनेला (shivsena) लक्ष्य केलं आहे.

निलेश राणेंनी (Nilesh Rane) यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये आणि सध्याच्या मुलाखतीमधील फरक दाखवणारा एक फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केलीय.

विशेष ही मुलाखत घेताना उद्धव ठाकरे आणि राऊत या दोघांच्या मध्ये मागील बाजूस दिसणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची फ्रेम ही राजकीय हेतूने वापरण्यात आल्याचा आरोप निलेश राणेंनी केलीय.

“उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात..’ असा टोला यावेळी राणे यांनी लगावला आहे.

निलेश राणेंनी (Nilesh Rane) यासंदर्भात ट्विटरवरुन भाष्य केलंय. सध्या निलेश राणेंचं हे ट्विट चांगलाच व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.