मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) (MPSC) एका मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे स्पर्धा परीक्षांच्या पारंपरिक पद्धतीच्या उत्तरपुस्तिकांचे डिजिटल पद्धतीने (Digital Assessment) मूल्यांकन करण्यात येणार आहे. अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांचे निकाल झटपट जाहीर करण्यासाठी एमपीएससीकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून पात्र कंपनीला ऑनलाइन मूल्यांकन पद्धतीचे काम दिले जाणार आहेत.

एमपीएससीकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या उत्तर पत्रिकांची मूल्यांकन पारंपारिक पद्धती ऐवजी डिजिटल पद्धतीने (Digital Assessment) करण्यात येणार आहेत.

या पद्धतीमुळे एमपीएससी कडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचे निकाल अचूक त्यासोबतच लवकरात लवकर जाहीर करण्यास मदत होणार आहे. असं देखील सांगण्यात आलं आहे.

सद्यःस्थितीत पारंपरिक उत्तरपुस्तिका तज्ज्ञांकडे मूल्यांकनासाठी जातात, त्यानंतर दोन वेळा पुनर्तपासणी करावी लागते. ही प्रक्रिया लाखो उत्तरपुस्तिकांसाठी करावी लागते.

उमेदवारांनी पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपुस्तिका मागितल्यास त्याच्या छायाप्रती उपलब्ध करून द्यावा लागतात. या प्रक्रियेत एमपीएससीला मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा आणि मनुष्यबळ खर्च करावे लागते.

कशी असेल डिजिटल मूल्यांकन पद्धत?

१. उत्तरपत्रिका स्कॅन करून त्याची एक पीडीएफ तयार होईल

२. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती संग्रहित करून ठेवलेली असेल

३. उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहिले असल्यास उत्तरपत्रिकेची तपासणी पूर्ण झालेली नाही, ही त्याच वेळी लक्षात येईल

४. डिजिटली मूल्यांकन करत असताना अचूक गुण उमेदवारांना दिले जातील

५. त्यासोबतच मूल्यांकनासाठी वेळ सुद्धा कमी जाईल

६. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या उत्तरपत्रिकेची पीडीएफ प्रत त्याच्या अकाउंटवर पाठवली जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा पुनर्मुल्यांकनासाठीचा वेळ आणि पैसा वाचेल