मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, आता सरकार स्थापन होऊन तब्बल 38 दिवस होऊन गेले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet Expansion) मुहूर्त ठरलेला नाही.

त्यामुळे या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे. इतर पक्षातील राजकीय नेते देखील सतत यावर आपली प्रतिकिया देताना दिसून येतात.

मात्र, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर आली असून, बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे.

सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने या बद्दल माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. असं देखील सांगण्यात आले आहे