पुणे – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ (eknath shinde) यांची प्रकृती (helath) बिघडली आहे. 30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला होता. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते सतत दौरे, सभा, कार्यक्रम करत आहे. आणि यामुळेच त्यांना थकवा जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे सर्व प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत.

Advertisement

या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दौरेही सुरु होते. त्यामुळेच का होईना त्यांना थकवा असल्याचे सांगितलं जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 50 हून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते.

Advertisement

आणि त्या दिवसापासूनच महाराष्ट्रात राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला.

मात्र, त्यानंतर काही दिवसांनी सर्व राजकीय उलथापालथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

Advertisement