मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती (accident) निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती.

दरम्यान उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. या घटने नंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रुग्णालयात जाऊन मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला. काल रात्री विनायक मेटेंनी सव्वादोन वाजता फडणवीसांना मेसेज केला होता, तो आपण आज सकाळी वाचल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “काल रात्री सव्वादोन वाजता त्यांनी मला मेसेज केला की मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे, त्यासाठी मी येतोय. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात.

मी सकाळी तुमच्याशी बोलतो..’ असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. मी आज सकाळी तो मेसेज वाचला.” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, “आजचा दिवस दु:खद घटनेनं सुरू झाला. सकाळी मला मेसेज आला की अपघात झाला आहे. पण त्यावेळी त्याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मी माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.

डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असं देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.