पुणे – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr Prakash baba Amte) यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर सर्वांमध्येच चिंतेचं वातावरण आहे. आमटेंना पुन्हा इन्फेक्शन झालं असून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (mangeshkar hospital pune) दाखल करण्यात आल्याची माहिती सुपुत्र अनिकेत आमटे यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच 74 वर्षीय प्रकाश आमटेंना दुर्धर हेअरी सेल ल्युकेमिया – ब्लड कॅन्सरचे (hairy cell Lukemia Blood Cancer) निदान झाले होते.

त्यावरील उपचारासाठी त्यांना 17 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातवून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मात्र आता डॉ. प्रकाश आमटे (Dr Prakash baba Amte) यांना पुन्हा न्यूमोनियाची लागण झाल्याने पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अशी माहिती प्रकाश आमटे यांच्या मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) माधमातूनही दिली आहे.

“प्रकाश आमटेंवर योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेजवर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये.

आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा’. असंही अनिकेत आमटेंनी सांगितलं आहे.

मागील काही दिवसात डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr Prakash baba Amte) हे बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातील दीक्षांत समारंभासाठी डॉ. प्रकाश आमटे गेले होते. मात्र, तिथे त्यांनी अस्वस्थ वाटू लागलं.

ताप आणि खोकला अशी लक्षणं आढळल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर (mangeshkar hospital pune) रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यांच्यावर न्युमोनियावर उपचार सुरू असतानाच काही चाचण्यांमधून त्यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग (hairy cell Lukemia Blood Cancer) असल्याचं निष्पन्न झालं.