मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर काल रात्री अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आता शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

आज 7:30 वाजता वाजता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी पार पडला असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा जयजयकार केला.

यावेळी, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री घोषणा ही बाबही अनेकांसाठी सरप्राईजिंग होती.