मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना अखेर काल रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. आज सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

Advertisement

शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. अवघ्या काही मिनिटांची ही भेट होती.

Advertisement

भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आलं होतं. संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी, दोन मुलींना उद्धव ठाकरे यांना निरोप दिला.

मात्र, आता या भेटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना (shivsena) काय भूमिका घेणार, संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Advertisement