मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस (devendra fadnavis) सरकारनं बाजी मारली आहे. विश्वासमताच्या बाजूने 164 मते पडली तर विश्वासमताच्या विरोधात 99 मते पडली. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. 

आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. असून, यामध्ये शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात शिंदेशाही सुरू झाली आहे.

दरम्यान, आज राज्यात शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असणार आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले असून, अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावे आघाडीवर होती. अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

Advertisement

दरम्यान, राज्यात शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचं देखील तोंड भरून कौतुक केलं आहे.

“शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता’ असल्याचे म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.

Advertisement