पुणे – पुणे शरातील धायरी (Dhyari pune) परिसरात एका नामांकित हॉटेल व्यवस्थपक तरुणाच्या डोक्यात वार करुन हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण धायरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे, सामान्य नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भरत भगवान कदम (वय 24, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी, पुणे) असे मृत (Murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

चोरीच्या उद्देशाने हा हल्ला (crime news) झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही. मात्र, याबाबत भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते.

यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावर निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या मोकळ्या जागेत हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले.

आणि त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि खाली पडले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळातून पळून गेले. मात्र, याची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

तेव्हा भरत कदम यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तेथेच त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी मिळून आली. तसेच त्यांच्या खिशातील पैसे आणि अन्य साहित्यही तसेच होते.

त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कदम यांच्या खुनामागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे धायरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.