पुणे – राज्यतील (maharashtra) अनेक भागांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस (Monsoon) सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुणे शहर आणि परिसरात देखील पावसानी (Monsoon) जोरदार बॅटिंग केली आहे. पुणे (pune gramin) जिल्ह्यात तर अद्यापही जोरदार पर्ज्यन्यवृष्टी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन (tourist) स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आता घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरल्याने हे आदेश मागे घेण्यात आले असून, पर्यटकांना पुन्हा एकदा निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे.

आता पुन्हा पर्यटकांना गड, किल्ल्यांवर जात येणार आहे. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड, किल्ले; तसेच पर्यटनस्थळांवर (tourist) जमावबंदीचे आदेश दिवसांपूर्वी देण्यात आले होते.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांच्या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणतीही वाहने जाण्यास किंवा पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मनाई केली होती. आता हे आदेश मागे घेण्यात आले.

‘पावसामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने 14 ते 17 जुलै या कालावधीसाठी जमावबंदीचे आदेश दिले होते. सध्या तरी जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना कोणतेही निर्बंध नाहीत.

मात्र, पर्यटकांनी निसर्गरम्यस्थळी (tourist) गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

तसेच, नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, डोंगरांतून कोसळणारे धबधबे अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे याठिकाणी खबरदारी घेण्याचे देखील सांगण्यात आले आहे.