पुणे – ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Statment) यांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही’. असं व्यक्तव प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. यांच्याकडून राज्यपालांच्या विधानाचं समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत (mumbai) केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मुंबई (mumbai) आमचा प्राण आहे, त्याबाबात एकही अपशब्द ऐकून घेणार नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी घेतली आहे.

सध्या त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, दुसरीकडे मात्र प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राजपालांच्या या विधानाचं समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, “राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही.

उलट राज्यातील नेत्यांचं राजकारण उघडं पाडलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. राज्यपालांची उचलबांगडी करण्याची गरज नाही. राज्यपाल जे बोललेत ती सत्य परिस्थिती आहे, असं आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणालेत.

तसेच, आता प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ नितेश राणेंकडूनही (Nitesh Rane) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे.

आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे (Nitesh Rane) म्हणतात की, “राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..

त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात.’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.