मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Statment) यांनी महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत (mumbai) केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. मुंबई (mumbai) आमचा प्राण आहे, त्याबाबात एकही अपशब्द ऐकून घेणार नाही, अशी भूमिका राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी घेतली आहे.

सध्या त्यांच्या या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र दिसते असून, सर्वच स्तरातून भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा निषेध नोंदवला जात आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट भाष्य केले आहे. पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Advertisement

यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलताना म्हणाले की, “राज्यपालांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे.

राज्यपाल हे मोठं पद आहे. एक संविधानिक पद आहे, कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायलाच हवी.

मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे, असंही ते म्हणाले.

Advertisement

तसेच, राज्यपालांनी काही खुलासा याबाबत केला आहे. पण त्यांनी कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले….

‘कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.

Advertisement

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.’