पिंपरी चिंचवड – पिंपरीमध्ये (pimpri) आज सोमवारी “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटाचा शो संभाजी ब्रिगेडने (sambhaji brigade) बंद पाडला. छत्रपती संभाजीराजे (chhatrapati sambhaji raje) यांनी पुण्यात (pune) इशारा दिल्यानंतर आज त्याचे तात्काळ पडसाद उमटले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या (sambhaji brigade) कार्यकर्त्यांनी थिएटर मध्ये घुसून घोषणाबाजी करत चित्रपट चा शो आज दुपारी 1 वा. चे सुमारास बंद पाडला आहे. इतिहासाची मोडतोड करणारा.

खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव” (har har mahadev) चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने बंद पाडेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

नव्याने प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड होत असल्याचा आरोप होतोय. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

हर हर महादेव या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे. शूरवीरांच्या कर्तुत्ववावर खोडसाळ पणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे.

कवड्याची माळ घातली आहे ती पण हस्यासस्पद जोगवा मागणाऱ्या माणसाची पण नसेल अशी. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे.

कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदलं देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहे.

‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली काय वाटेल ते दाखवले जात आहे. हे अजिबात खपवून घेणार नाही. मी छत्रपतींच्या घराण्याचे नाव सांगतो. मी वाटेत आडवा येईन.

आपल्या इतिहासाची मोडतोड केलेल्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलीच कशी, असा सवाल त्यांनी केला होता. विपर्यस्त चित्रण करणारे चित्रपट आपण प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत.

याचे भान कुठे हरवले आहे, याविषयी मी स्वतः सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिणार आहे. सर्व ऐतिहासिक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना मी जाहीरपणे सांगतो, की चुकीचा इतिहास चित्रित केलात, तर याद राखा, माझ्याशी गाठ आहे. असा इशाराही त्यांनी दिला होता.