पुणे – गेल्या 10 दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर काल रात्री अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे.

शिंदे गटाने 39 आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं.

त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली.

त्यासोबतच त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेतील आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळले याचा निषेध म्हणून,

मावळ शिवसेनेच्या वतीने जुन्या पुणे-मुंबई महामार्गा (mumbai pune expressway) वर सकाळी 6 वाजता टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.

शिवसेना मावळ च्या वतीने सोमटने फाटा येथे शिवसैनिकानी (shivsena) जूना मुंबई-पुणे हायवे (mumbai pune expressway ) सकाळी 6 वाजता अडवून आंदोलन करण्यात केले.

मविआ सरकार कोसळल्यानंतर मावळ शिवसेना आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, गेल्या 10 दिवसात ठाकरे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

एक अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी काल बंडखोर शिवसेना नेत्यांना भावनिक सादही घातली. मात्र, बंडखोर शिंदे गट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. आणि उद्धव ठाकरेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.