पुणे – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून आजपासून बूस्टर (Corona Booster Dose) डोसची लसीकरण मोहिम राबवली जात आहे. त्यामुळं स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पार्श्वभूमीवर येत्या 75 दिवसांत मोफत संपूर्ण बूस्टर डोसचं (Booster Dose) लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दीष्ट सरकारनं समोर ठेवलं आहे.

आणि याच पार्श्ववभूमीवर ‘कोविड लस अमृत महोत्सव’ हा उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. दरम्यान, या उपक्रम अंतर्गत नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत मोफत डोस मिळणार आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस (Booster Dose) घेता येणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून याच निमित्तानं देशात 75 दिवसांसाठी ‘कोविड लस अमृत महोत्सव’ राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा, हाच त्यामागील मुख्य हेतू आहे.

दरम्यान, यापूर्वी दुसऱ्या डोसच्या 90 दिवसांनंतर अर्थात तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. मात्र, आता या कालावधीत बदल झाला असून तो कमी करण्यात आला आहे.

त्यामुळं आता बूस्टर डोस दुसऱ्या डोसनंतर 75 दिवसांत अर्थात अडीच महिन्यांनंतर घेता येणार आहे. करोनापासून (Corona) बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

दरम्यान, आजही अनेकांच्या मनात बूस्टर डोसबाबत संभ्रम आहे. करोना (Corona) लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बूस्टर डोस का महत्त्वाचा?

डोस घेतल्यानं काही त्रास तर होणार नाही ना? पण खरंच बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

लसीच्या प्राथमिक डोसनंतर दिल्या जाणाऱ्या डोसला बूस्टर डोस असं म्हटलं जातं. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोस दिला जातो.