पुणे – पुणे शहर (pune city) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन परिसरांमध्ये वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक महत्वाच्या चौकांमध्ये तर तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

दरम्यान, आता पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड या दोन भागांमधील वाहतूककोंडीचा (Traffic jam) प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरीचिंचवड वाहतूक आयुक्तांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

खासकरून दापोडी येथून खडकीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी वाहने ही उभीर राहतात. परिणामी वाहतूक कोंडी होत असल्याने ट्रॅव्हल्स बसेस, अवजड वाहनांना २१ आक्टोबरपासून सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंदी केली आहे.

या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरावा अशा सूचना पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक आणि काही खासगी बसेस या निगडी ते पुणे आणि चाकण ते पिंपरी किंवा पुण्यात येत असतात. पीक पिरेडमध्ये या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांना पुढे जाण्यास अडचणी निर्माण होतात. पर्यायाने वाहतूककोंडीत अधिक भर पडते. या सोबतच पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स बस दापाेडी येथून हॅरिस पुलावरून जातात.

दररोज सायंकाळी गर्दीच्या वेळेत जातात. त्यामुळे खडकी रेल्वे ट्रॅक येथे वाहतूक कोंडी होते. या कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या दापोडीपर्यंत रांगा लागतात. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी हा आदेश भोईटे यांनी दिला आहे.

त्यामुळे भोसरी, दिघी, आळंदी, सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतून नाशिक फाटा मार्गे खडकीकडे जाणाऱ्या ट्रव्हल्स बसेस व अवजड वाहनांना दापोडी येथील हॅरिस पूलमार्गे खडकी व पुण्याकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.