मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आणि त्यामुळे आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळलं असल्याचं आपल्या सर्वाना माहित आहे.

हे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

आणि अश्यातच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक मोठं विधान केलं असून, पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की.., “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात.” असं विधान त्यांनी केलं आहे.

मात्र, आता सुप्रिया सुळे यांच्या या विधवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) चांगलाच टोला लगावला आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिंदे गट या वादासोबतच भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा राज्यात पाहायला मिळत आहे.

सुप्रिया सुळेंच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पहा…..

“तो काळ गेला आहे. शरद पवारांचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे.

पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे.” असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.