मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut) यांच्या घरावर काल (31 जुलै) सकाळीच ईडीची (ED raids) धाड पडली आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही धाड पडली असून, दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या (ED raids) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले होते. त्यानंतर ईडीने (ED raids) याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

Advertisement

आज संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे.

काल राऊत घरातून बाहेर पडतानाचा संजय राऊत यांचे कुटुंबीय अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले होते. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्रींनी त्यांचं औक्षण केलं आणि राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.

दरम्यान, आता यावरून भाजपचे निलेश राणे (nilesh rane) यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचावर निशाणा साधला आहे. या संदर्भातील एक ट्विट देखील त्यांनी पोस्ट केलं आहे.

Advertisement

आपल्या ट्विट मध्ये निलेश राणे म्हणतात की..,

“दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये.

Advertisement

हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो.” असं सूचक वक्तव्य त्यांनी (nilesh rane) केलं आहे. सध्या त्यांच हे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.