पुणे – रेल्वे प्रवाशांसाठी (Train) अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून, पुढील काही दिवस पुणे-मुंबई (Pune-Mumbai) दरम्यान दैनंदिन धावणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या रेल्वे (Train) रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (chhatrapati shivaji maharaj terminus) ते मशीद रोड स्थानकादरम्यानचा कॅरनाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वेकडून (Train) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई (Pune-Mumbai) दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द (Train) करण्यात येणार असून, पुणे विभागातून जाणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.

त्यामुळे १९ आणि २१ नोव्हेंबरलाही पुणे विभागातील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत असण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घेण्यात येणाऱ्या ‘ब्लॉक’मुळे तीन दिवस मध्य रेल्वेच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ‘लोकल लाइन’, ‘फास्ट लाइन’ आणि ‘हार्बर लाइन’वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद स्थानकादरम्यान १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक आणि ‘पॉवर ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे वेळापत्रकाची खातरजमा करावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. पुणे-मुंबई (Pune-Mumbai) मार्गासह मुंबईतून सुटून पुण्यामार्गे धावणाऱ्या ३६ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

तर, ५७ रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पुणेमार्गे मुंबईला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, तिरुवअनंतपुरम एक्स्प्रेस, गदग एक्स्प्रेस आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्या १९ नोव्हेंबरला पुण्यापर्यंतच धावणार असून, २० नोव्हेंबरला त्यांचा परतीचा प्रवास पुण्यातूनच होणार आहे.

‘या’ आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या…

१९ नोव्हेंबरला पुण्यापर्यंतच धावणाऱ्या गाड्या : गदग-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम-मुंबई एक्स्प्रेस, बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस

१९ नोव्हेंबरला पुणे विभागातील रद्द गाड्या : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस.

२० नोव्हेंबरला पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस.