मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री ११ वाजता शासकीय निवास्थानी म्हणजेच, ‘वर्षा’ बंगल्यावर भेट झाल्याचं समोर आल आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)काल रात्री उशिरा वर्षावर दाखल झाले. यावेळी या दोन नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात आलं असून, कोणत्या विषयावर ही चर्चा झाली आहे. हे अद्याप समोर आलं नसून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धुमाकूळ माजला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची भेट घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

यावेळी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) आणि महामंडळांच्या नियुक्तीवर चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे रात्री ११ च्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. याप्रसंगी फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कारही केला.

त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात दोन तास चर्चाही झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अधिक चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र जेव्हा एकत्र येतात…

नुकतंच, मनसेकडून मुंबईतील शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या (diwali) कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आले होते.

यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे (diwali) उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज यांच्याकडून मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली.

मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमात प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने, राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.