मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आता शिवसेना (shivsena) फुटल्यानंतर काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहेत, असा दावा ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केला आहे. हा दावा करणारा नेता माजी खासदार आहे. शिंदे गटाचे 16 आमदार बाद होण्याची भीती आहे.

त्यामुळे आपली सत्ता जाऊ शकते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काँग्रेसचे (congress) 22 आमदार तयार ठेवले आहेत. निकाल येताच हे आमदार फुटू शकतात, अशी शक्यताही या नेत्याने वर्तवली आहे.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे व्यक्तव राज्यातील महत्त्वाचे नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे :

काँग्रेसचे 22 आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी (chandrakant khaire) केला आहे. “देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत.

यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील. कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असं खैरे (chandrakant khaire) म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत खैरेंच्या या व्यक्तवर काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “जे आपलाच पक्ष सत्तेत असून सांभाळू शकले नाहीत, तर दुसऱ्या पक्षाविषयी त्यांनी बोलायचं कारण नाही”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.