पुणे – गेल्या काही महिन्यांपासून भाजप (bjp) आणि मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यामध्ये भेटीगाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्वामध्ये भाजप आणि मनसे युती होणार अशा चर्चांनादेखील उधाण आले आहे. मात्र, अश्यातच नुकतंच भाजपकडून या चर्चांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. पण मनसे-भाजप युतीला कोणीही विरोध केलेला नाही. 

मात्र, आता पहिल्यांदाच या युती विरोधात भाजपकडून मोठं व्यक्तव पुढं आलं आहे. आणि या व्यक्तव्या मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ सुद्धा होण्याची शक्यता आहे.

नुकतंच भाजपचे माजी खासदार संजय काकडे (sanjay kakade) यांनी या युतीची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या त्यांच्या या व्यक्तव्याची राज्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

भाजपचे नेते, माजी खासदार संजय काकडे (sanjay kakade) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरच बोट ठेवत युतीला विरोध केला.

“भाजप – मनसे युतीची आम्हाला गरज नाही. पक्षाने जर तसा निर्णय घेतला तर माझा या युतीला विरोध असणार आहे’, असा इशाराच संजय काकडे यांनी केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले. “ज्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांच्यासोबत जाऊच कसे शकतो? अशा लोकांबरोबर जाण्याची गरज नाही. मोदींवरील टीकेबाबत राज ठाकरे यांनी आधी उत्तर द्यावे, मगच पुढे बोलू’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय काकडे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मनसे ही शिवसेनेची बी टीम असल्याचं म्हटलं आहे. गरज पडली तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ. शिवसेना आमचा पारंपारिक मित्रं आहे. शिवसेनेसोबत जाणं कधीही योग्यच आहे. असं देखील ते म्हणाले.