पुणे – गेल्या 10 दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर काल रात्री अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे.

शिंदे गटाने 39 आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं.

त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली.

त्यासोबतच त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

सध्या राज ठाकरेंचं (Raj Thackeray) हे महत्त्वाचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये काय म्हणाले –

“जेव्हा माणून स्वतःच्या सौभाग्यालाच आपल्या वैयक्तिक आयु्ष्याचं कर्तृत्व मानू लागतो, त्या दिवसापासून त्याच्या अधोगधीच्या प्रवासाला सुरुवात होते”. असं ते म्हणाले.

तर हिंदीमधून राज ठाकरे यांनी याबाबतची मूळ पोस्ट केली आहे. ‘जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है उस दिन से पतन का प्रवास शुरु होता है’ अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.