मुंबई – कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या (ED) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut Case) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे.

आज कोर्टात काय घडलं?

ईडीने (ED) जे आरोप केलेले आहेत, त्याचा कुठलाही संबध लागत नाही. यात संजय राऊत यांचा प्रत्यक्षरित्याकाहीही संबध लागत नाही. प्रविण राऊत यांना जे पैसे मिळाले ते पीएमसी बँकेशी संदर्भात होते.

पण राऊत यांचा काहीही संबध नसताना त्यांची प्रॉपर्टी का जप्त केली, असा युक्तीवाद राऊतांच्या वकिलांनी आज कोर्टात केला. आणि त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय देत 2 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश दिले.

शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे.

ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. आणि दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तेव्हापासून राऊत ईडी कोठडीत होते.

संजय राऊत यांचा कोठडीतील दिनक्रम…

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी देण्यात आली आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यांना ट्रीटमेंट देण्यात येत असली तरी देखील आपला बराचसा वेळ संजय राऊत वाचन, लिखाणामध्ये घालवत आहेत.

शिवाय बातम्याही ते पाहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही. मात्र, इतर काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या सर्वसाधारणपणे नियमानुसार मिळतात. त्यात वही-पेन त्यांना पुरवण्यात आले आहे.