मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना बुधवारी आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. “त्यांना भेटायचं असेल तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी’ असे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना सांगण्यात आलं आहे.

शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना 31 जुलै रोजी ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली.

पत्राचाळ घोटाळ्यात (Patra Chawl Scam Case) ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती.

मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते.

आणि दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. सध्या खासदार संजय राऊत यांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा एकदा वाढला असून, आता राऊत 19 सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत.

उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारताना तुरुंग प्रशासनाने म्हंटले आहे की, ” संजय राऊत यांना भेटायचं असेल तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी” असे सांगितले आहे.

सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशाच पद्धतीने उद्धव यांना संजय राऊतांना भेटता येईल असं तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही.

इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असं तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांना भेटण्यासाठी युद्ध ठाकरेंना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.