पुणे – गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची (baramati) राज्याच्या राजकाणात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामती दौऱ्यादरम्यान 2024 च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले’ असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी केलं.

दरम्यान, आता पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी असच एक वक्तव्य केलं असून, याची देखील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

यावेळी मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या (narendra modi) नादी लागू नये. मोदी (narendra modi) हे खूप मोठे नेते आहेत’. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

नेमकं चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले….

शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदीजींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठं आहे.

त्यांना 150 देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत.

ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत, अशी खोचक टीका करतानाच शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी (narendra modi) हे खूप मोठे नेते आहेत, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.