मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut) यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) तुरुंगात होते. मात्र, काल त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) काल तुरुंगातून बाहेर आले आहेत. दरम्यान, राऊत (Sanjay Raut) तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाने एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. तसेच आता ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्याने ऑर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी उशिरा मुक्तता करण्यात आली. तेव्हा शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करून मिरवणूकही काढली.

दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर आज संजय राऊत मातोश्रीवर (Matoshree) जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की, “शिवसेना (Shivsena) एकच आहे, यामध्ये गट वगैरे काही नाही’.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ‘संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे.’

संजय राऊत मोदी आणि शहांना का भेटणार, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ‘ संजय राऊत (Sanjay Raut) माझ्या बाजूला बसले आहेत.

त्याला काही करायचं असेल तर त्याने उघड उघड केलं असतं. तिकडे जाऊन त्याला मांडवली करायची असती तर तो शंभर दिवस तरुंगात राहिला नसता. पण त्याने दाखवून दिलयं.

तसेच ते पुढे (Uddhav Thackeray) म्हणाले, एवढे दिवस झुकेगा नही… असं म्हणणारे संजय राऊत आता नरमणार का, असं शंकेचं मोहोळ उभं राहतंय.

आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याचं उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना मांडवली करायची असती तर तेव्हाच केली असती, 102 दिवस जेलमध्ये का घालवले असते? असं ठाकरे यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांची मंगळवारी जामीनावर सुटका झाली. बुधवारी संजय राऊत हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते बोलत होते.