मुंबई – शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार ‘संजय राऊत’ (Sanjay Raut Case) यांना अखेर काल रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. आज सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

ईडीने यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

त्यामुळे ईडीचे अधिकारी थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. मात्र, दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

Advertisement

शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे. आणि याच वरून आता भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (Bjp Jp Nadda) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

जे पी नड्डा (Bjp Jp Nadda) बिहारमध्ये भाजपाच्या 14 जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (shivena) संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेख केला आहे.

अखेर जे पी नड्डा काय म्हणाले…

Advertisement

जे पी नड्डा (Bjp Jp Nadda) म्हणाले “भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे.”

जे पी नड्डा यांनी यावेळी शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला.

ते म्हणाले की, ‘तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे’. असं म्हणाले आहे.

Advertisement