पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गट शक्तिप्रदर्शन करून सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडाने गेल्या चार दिवसांपासून राज्याचे राजकारण हे ढवळून निघत आहे.

मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी त्यांच्या समवेत 50-52 आमदार घेऊन थेट गुवाहाटी गाठल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याने मुख्यामंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

दरम्यान, सध्या राजकीय परिस्थितीवर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते चाकणमध्ये (Chakan) बोलत होते.

यावेळी आढळराव (Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले की, “शिवसेनेत आत्ता बंडखोरी झाली. पण अशी बंडखोरी दीड वर्षांपूर्वी झाली होती. खेड तालुक्यात झालेल्या बंडखोरीची दखल घेतली गेली नाही.

त्यावेळी दुदैवाने बंडखोरी करणाऱ्या गद्दारांचा निषेध करावा, अस वाटले नसल्याची खंत व्यक्त केली. राष्ट्रवादीवरही (NCP) त्यांनी यावेळी टीका केली.

तसेच, राज्यात राष्ट्रवादीचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसल्याचा गंभीर आरोप शिवाजी आढळराव पाटलांनी केला. आपण पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो, याचे स्वागत आणि आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला आहे.

आणि त्यानंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 50 हून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

आणि त्या दिवसापासूनच महाराष्ट्रात या राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला.