मुंबई – काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांविषयी (Veer Sawarkar) केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने (BJP) शिवसेनेला चांगलेच घेरले आहे. त्यावर भाष्य करताना राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. त्यानंतर आता ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मत मांडले आहे.

“राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते’, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती.

त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देतानाच सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

‘वीर सावरकर (Veer Sawarkar) हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितले की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी,

चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो.” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.

बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर त्यांची रॅली सुरू आहे. असं सुरू असताना हा विषय काढण्याची गरज नव्हती, असं देखील संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

दरम्यान, पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा या यात्रेचा मार्गक्रमण असून काल या यात्रेचा 31वा दिवस होता.

काल राहुल गांधी यांनी कर्नाटकातील तुरुवेक्रे येथे माध्यमांशी संवाद संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएस (RSS) आणि वीर सावरकर यांच्यावर निशाना साधला.

‘मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.