पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) देखील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.

तर दुसरीकडे राज्यात मुंबई, रायगड, कोल्हापूर मध्ये पावसानं थैमान घातलं आहे. दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातली जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, चिपळूण शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

आणि याच पार्श्ववभूमीवर ज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल NDRF 17 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

यातील 5 तुकड्या मुंबई , 2 तुकड्या रत्नागिरी ,रायगठ , ठाणे ,कोल्हापूर आणि 101 तुकडी पालघर , सातारा , सिंधुदुर्ग येथे रवाना झाल्या आहेत.

अशी माहिती पुणे NDRF चे कमांडिंग ऑफिसर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे. तसेच, पुढील पाच दिवस कोकण आणि 7 आणि 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून, ऑरेंज अलर्ट (Orange alert) हवामान खात्याने जारी केला आहे.

त्यामुळे येत्या दोन-तीन दिवस नागरिकांनी देखील आपली काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, घराबाहेर पडण्यास देखील मनाई केली आहे.