पुणे – ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (St Smart Card) 2018-19 मध्ये सवलतधारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड (St Smart Card) योजनेची घोषणा केली. दरम्यान, एसटीच्या संपकाळात कार्डनोंदणी-वितरण व्यवस्था पूर्णपणे बंद होती. आता ती सुरू झाली असली तरी ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, या योजनेला 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही वाढ झाली आहे.

गणेशोत्सव आणि दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणी व वितरणासाठी ही मुदतवाढ देण्यात अली असल्याचं सांगण्यात आहे.

स्मार्ट कार्ड (St Smart Card) बंधनकारक केले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. तब्बल तीन ते चार वेळा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी आणि तरुणांनी लवकरात-लवकर आपले स्वतःचे स्मार्ट कार्ड (St Smart Card) काढून घेणे गरजेचे आहे.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2018-19 मध्ये सवलतधारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडय़ामध्ये २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देते.

या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली.

मात्र कोरोना संसर्ग आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक लाभार्थीना आगारात येऊन स्मार्ट कार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्ट कार्ड घेणे शक्य झाले नव्हते. म्हणून आता या योजनेला 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, अद्याप बऱ्याच प्रवाशांनी स्मार्ट कार्ड (St Smart Card) घेतलेले नसल्याने या योजनेला आणखी काही आठवडे मुदतवाढ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात आली असून, लवकर हे कार्ड (St Smart Card) काढून घ्यावे.