मुंबई – राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केलीय. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, तर देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, ‘शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आता चांगलाच संघर्ष होत असून यामध्ये कार्यकर्ते होरपळत आहेत’. असं मत राजकीय नेत्यांकडून होत आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याचं ट्विट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyed) यांनी केलं. सध्या त्यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

येत्या दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा दिपाली सय्यद यांनी केला.

त्यावरून आता अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. नुकतंच सय्यद (dipali sayyed) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी दोन्ही नेत्यांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटमध्ये मांडलं आहे.

दोन्हीकडच्या आमदारांचीही तीच भावना आहे, असं दिपाली सय्यद (dipali sayyed) यांनी सांगितलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर हे संकट ओढवल्याची चर्चा आहे. त्यावर मात्र त्यांनी राऊतांची पाठराखण केली.

आपल्या ट्विट मध्ये दिपाली सय्यद काय म्हणतात…

“मी दोन्ही गटांमध्ये चर्चा केली. या चर्चेनंतर मला जाणवलं ते मी ट्वीट करुन लिहिलं आहे. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं असं मला मनापासून वाटतं. दोन्ही गटांमध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत असून लवकर यश मिळेल अशी आशा आहे’. या आश्याचे ट्विट त्यांनी केलं आहे.