मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेला (shivsena) वाचवण्याच्या प्रयत्नात मैदान उतरले आहे.

तर, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठा यात्रेच्या माध्यमांतून विस्कटलेल्या पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या आदित्य ठाकरे हे मुंबईत ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांना भेटत आहेत. या निष्ठा यात्रेत ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

त्यात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झालीय.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चालेल्या या संघर्षात आता उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे (tejas thackeray) यांची राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लवकरच तेजस ठाकरे (tejas thackeray) महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसून येतील अशा विश्वास शिवसेना नेत्यांकडून वर्तविला जात आहे.

शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी या विषयाला अधिकृत दुजोरा दिल्याचे पाहायला मिळत आहे. प्रधान म्हणाले की, शिवसेना पक्ष म्हणून काम करतेय, कुणी कितीही दावे केले तरी त्याचा फरक पडत नाही.

शिवसेना आजही, उद्याही आणि भविष्यातही काम करत राहणार आहे. शिवसेनेत घडत असलेल्या घडामोडीमुळे ठाकरे कुटुंब मनातून दुखावले गेले आहे.

तरीही उद्धव ठाकरे कणखर आहेत, रश्मी ठाकरे त्यांच्या पाठिशी ठाम आहेत, आदित्य, तेजसही (tejas thackeray) पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहेत असं त्यांनी सांगितले,

तसेच तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं ही कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे, पण हा ठाकरे कुटुंबाचा प्रश्न आहे. असं ते यावेळी म्हणाले. त्यामुळे आता तेजस ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.