मुंबई – एनसीबी (NCB) मुंबईचे माजी संचालक ‘समीर वानखेडे’ (sameer wankhede) यांना नुकताच मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखडे यांना जात पडताळणी समिती (Caste scrutiny committee) कडून क्लीन चिट मिळालीये. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘नवाब मलिक’ (Nawab Malik) यांच्यासह इतरांनी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

मात्र, आता यामध्ये वनखानडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. क्लीन चिट देताना समितीने अहवालात म्हटलंय, ‘वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते; वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असंही सिद्ध झाले नाही,

‘परंतु हे सिद्ध झाले आहे की ते महार -37 अनुसूचित जातीचे होते. “समीर वानखेडे (sameer wankhede) यांची जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले होते.

दरम्यान, आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधातील अॅट्रोसिटी प्रकरणात वाशीम न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती दिली.

तसेच खूप खालच्या पातळीवर आरोप झाल्याने वानखेडे कुटुंबाला खूप त्रास झाल्याचं वानखेडेंनी म्हटलं. ते गुरुवारी (25 ऑगस्ट) वाशीममध्ये आले असताना माध्यमांशी बोलत होते.

समीर वानखेडे म्हणाले, ’14 ऑगस्टला मुंबईत जात पडताळणी समितीने निकाल दिला. या निकालानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात एस. सी. एस. टी. कायद्यानुसार अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

याशिवाय भारतीय दंड विधानानुसार मानहानीची कलमं देखील लावली होती. माझे बंधु संजय वानखेडे यांनीही वाशिममध्ये तक्रार नोंदवली होती.

“आणि त्याअनुषंगाने आज मी वाशीम जिल्ह्यात न्यायालयासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. आमचा न्यायालयावर खूप विश्वास आहे. आम्हाला नक्की न्याय मिळेल.

खूप खालच्या पातळीवर आरोप झाल्याने वानखेडे कुटुंबाला खूप त्रास झाला होता. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे.’ असं वानखेडेंनी यावेळी सांगितलं आहे.