मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

30 जूनला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

नुकतंच या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम देखील पार पडला असून, शिंदे गटाकडून नऊ तर भाजपाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, आता या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतं खातं कोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अश्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खातेवाटपावर आपली प्रतिक्रिया देत एक मोठं विधान केलं आहे.

खातेवाटप कधी होणार? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, “खातेवाटप लवकरच होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे,

तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खातेवाटप करत आहात. आम्ही पेपर फोडला, तर तुम्हाला काम मिळणार नाही’. असं ते म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, “मला असं वाटतंय उद्धव ठाकरेंनी फक्त अहंकारासाठी (इगो) कांजुरमार्गाचा आग्रह धरला. मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झाले आहे’.