पुणे – सध्या तरुणांचे वाढदिवस साजरे करण्याची अनोखी पद्धत शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरात रूढ झाली आहे. रात्री बाराच्या सुमारास एकत्र यायचे, कोणीतरी केक (cake cutting) आणतो, तो दुचाकीवरच ठेवायचा आणि तलवारीने तो कापताना (cake cutting) व्हिडिओ करून व्हायरल करायचा. त्यानंतर होणाऱ्या फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीने सारा परिसर जागा होतो. असं काहीसं दृश्य एका काँग्रेस आमदाराच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे.

चक्क कोयत्याने केक कापून (cake cutting) काँग्रेस आमदाराने कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत. इगतपुरीतील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे आपल्या जवळच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी पोहोचले.

यावेळी त्यांनी हातात कोयता पकडून कार्यकर्त्यासह केक (cake cutting) कापला. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक राजकीय नेतेही केक कापताना सोबत दिसून आलेत.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ कार्यकर्त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलाय. त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय पातळीचा स्तर खालावत चाललाय की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

सध्या, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीतील नेतेदेखील त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी होणार आहे.

असं असताना काँग्रेसचे विद्यमान आमदारच धारदार कोयत्याने केक कापत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून, सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

नांदेडच्या शंकर नगरमधून राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरुवात झाली. असंख्य कार्यकर्ते या यात्रेत सामील झालेत. भारत जोडो यात्रे निमित्त राहुल गांधींचे चार मुक्काम असणार आहेत. नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर १० नोव्हेंबर रोजी या यात्रेतील राज्यातील पहिली सभा होईल.