सध्या अंडी किंवा बदाम अशा व्यवसायांतील उद्योजक त्यांच्या उत्पादनाची एकत्रित जाहिरात करतात. त्याच धर्तीवर सर्व सहकारी पतसंस्था एकत्रित येऊन व्यवसायाचे मार्केटिंग करणार आहेत.

सर्व पतसंस्थांसाठी एकच क्रेडिट कार्ड सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसांत अशा स्वरूपाचे क्रेडिट कार्ड पतसंस्था महासंघ आणणार आहे.

शाखाविरहित पतसंस्था सुरू करणार

राज्यातील सहकारी पतसंस्थांनी व्यवसायात वाढ करण्यासोबतच ठेवीदार-खातेदारांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हिजन २०२५’ अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

त्याला सहकार खात्याची मान्यता मिळाल्यानंतर क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित आणि शाखाविरहित पतसंस्था सुरू करणे शक्य होणार आहे.

स्पर्धेत टिकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

राज्यात सध्या मोठ्या पतसंस्थांचा अपवाद वगळता इतर पतसंस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुलनेत कमी होतो.

त्यामुळे काही नागरी सहकारी बॅंकांच्या तुलनेत पतसंस्थांच्या ठेवी अधिक असूनही पतसंस्थेत नफ्याचे प्रमाण कमी असते.

Advertisement

त्यामुळे पतसंस्थांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पतसंस्थांकडून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित बॅंकिंग, शाखाविरहित पतसंस्था आणि निओ बॅंकिंग प्रणाली अशा विविध पर्यायांचा अवलंब करण्यात येणार आहे.

निओ बॅंकिंग प्रणाली सुरू करणार

सहकार खात्याकडून सध्या नवीन शाखांना परवानगी दिली जात नाही. नवीन शाखेसाठी कार्यालयीन जागा, फर्निचर आणि कर्मचाऱ्यांवरील वेतनाचा खर्च वाढतो.

Advertisement

सध्या विविध पतसंस्थांमध्ये कामकाजासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान वापरले जाते; परंतु भविष्यात सर्व पतसंस्थांना संलग्न ठेवणारे तंत्रज्ञान असणे अपेक्षित आहे.

निओ बॅंकिंग प्रणाली सुरू केल्यास नवीन शाखेची इमारत आणि फर्निचरवरील खर्चही टळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनमार्फत सहकार खात्याकडे देण्यात येणार आहे.

प्रस्ताव सहकार आयुक्तांना

“राज्य सहकारी पतसंस्था महासंघाने क्लाउडवर आधारित बॅंकिंग, शाखाविरहित बॅंकिंग, निओ बॅंकिंग असे पर्याय स्वीकारण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयात देण्यात येणार आहे.

Advertisement

त्याला मान्यता मिळाल्यास पतसंस्थांना त्यांचा कारभार पारदर्शक आणि गतीने करता येणार आहे,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

 

Advertisement