मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) या केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) देशाचा २०२२ चा अर्थसंकल्प (Budget) जाहीर करत आहेत. यंदाच्या या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी संसदीय अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी करण्यात येत आहेत. येणाऱ्या आर्थिक वर्षात केंद्र सरकार शेतकऱ्यांना (MSP) एमएसपी अंतर्गत २.७ लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारने (Central Goverment)  कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना अग्रेसर बनवण्यासाठी विविध योजनांसाठी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांना अधिक आर्थिक लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. २४ जानेवारीच्या आकडेवारीनुसार केंद्राने सध्या सुरू असलेल्या विपणन सत्र २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ६०६.१९ लाख टन धान खरेदी केले आहे.

या धान्य खरेदीमध्ये सर्वाधिक धान्याची खरेदी पंजाबमधून झाली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत सुमारे ७७ लाख शेतकऱ्यांना १,१८,८१२.५६ कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ झाला आहे.

२०२२ च्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीच्या काळात शेती क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक वर्षात 3.9 टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.

Advertisement