पुणे – काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठेत (Budhawar Peth) दोन गटात तुफान हाणामारी (criem) झाल्याची घटना घडली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील (Budhawar Peth) क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना पोलिस स्टेशनपासून (Police) हाकेच्या अंतरावर घडली.

दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत होते. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेत हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली.

या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. घटनेनंतर बुधवार पेठ परिसरात भीतीचे (Crime) वातावरण पसरले होते. मात्र, आता पोलिसांनी या तरुणांना तयात घेतलं आहे.

माध्यमात यासंबंधीच्या बातम्या येताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

विशाल मोतीपवळे (वय 21, नरेगाव पुणे) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचे मित्र बुधवार पेठेतील क्रांती चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थांबले होते.

यावेळी दुचाकी घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना कट मारून जात होते. फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर दुचाकी वरील तीन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

तर दुसरीकडे लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या पाठीवर वार केला. मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या मित्रालाही आरोपींनी डोक्यात लोखंडी कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण असल्याचं दिसून येत आहे.