Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

बांधकाम व्यावसायिकाला फसवणूक प्रकरणी अटक

भिशीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार ताजा असतानाचा बांधकाम व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

डीएसकेनंतर लंकड ग्रुप घोटाळ्यात

पुण्यातील लंकड रिअॅयलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल लंकड रिअॅयलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला अटक केली. पुण्यात डीएसकेनंतर लंकड ग्रुपकडून फसवणुकीचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.

काय आहे घोटाळा

गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते; मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आणखी काही कोटींचा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येरवडा तुरुंगात रवानगी

एमपीआयडी कायद्यांतर्गत अमित लंकडवर कारवाई करण्यात आली आहे. लंकडला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

पुण्यातील राहत्या घरातून सोमवारी रात्री अटक झाल्यानंतर मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.

Leave a comment