पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीला (Bull Cart Race) परवानगी (Permission) दिल्यानंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) बैलगाडा शर्यतीच्या परवानग्या नाकारल्या होत्या.

त्यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या बारामतीतच (Baramati) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

बारामतीमधील (Baramati) वाघळवाडी (Vaghalwadi) मध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन (Organizing) करण्यात आले होते.

Advertisement

वाघळवाडी गावाच्या हद्दीत एका शेतामध्ये शर्यतीचे मैदान (Racecourse) तयार करून आरोपींनी विनापरवाना बैलगाडा शर्यती घेतल्याचे उघडकीस आले आहे.

बैलगाडा शर्यती घेतल्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अवमान केला आहे.

आरोपींची विनापरवाना (Unlicensed) बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तसेच कोरोना नियमांचेही (Corona rules) उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक ज्ञानेश्वर पांडुरंग सानप यांनी तक्रार दिली आहे. अजय तात्याबा सावंत, जालीदंर शकर अनपट, शुभम उर्फ बाबु जाधव (पुर्ण नाव नाही) रुत्विक उर्फ बापु सावंत (पुर्ण नाव नाही)

महादेव सकुंडे (पुर्ण नाव माहीत नाही), विकी सावंत (पुर्ण नाव माहीत नाही, सुहास गोरख जाधव, प्रणव उर्फ मोन्या बापुराव सावंत, सवाणे (पुर्ण नाव नाही) ( सर्व रा वाघळवाडी ता बारामती) जगताप (पुर्ण नाव नाही रा. मळशी वाणेवाडी ता. बारामती) आणि इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement