पिंपरी चिंचवड – बुलेट (bullet bike) गाडीला मॉडीफाय केलेले सायलेन्सर (silencer) लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहतो. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे (silencer) मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते, शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही सहन करावा लागतो. बुलेटवरून (bullet bike) हवा करत फिरणाऱ्या अशाच अतिउत्साही युवकांची हवा काढण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Police Action) कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Deputy Commissioner of Police Anand Bhoite) यांनी बुलेट सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

बुलेटचा फाडफाड आवाज काढून फिरणाऱ्या बुलेट चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलीस कारवाई करत असून, अगोदर केवळ बुलेटचा सायलेन्सर काढून घेतला जात होता.

Advertisement

आता मात्र थेट ध्वनी प्रदूषण (Sound Pollution) होत असल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत 22 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘बुलेट या दुचाकीचे सायलेन्सर बदलून वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. एक फॅशन म्हणून दुचाकीचालक याकडे पाहतात, असे आनंद भोईटे (Anand Bhoite) यावेळी म्हणाले.

तसेच, रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात. त्यादृष्टीने मागील काही दिवसांपासून जवळपास 2200 बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

त्यांच्याकडून 22 लाख दंड वसूल केला. मात्र तरीदेखील काही वाहनचालकांमध्ये अद्याप सुधारणा नाही झालेली. असे देखील भोईटे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात देखील नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुलेट सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई केली होती.

यावेळी एकाच दिवसात तब्बल 346 बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, 3 लाख 46 हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता.

Advertisement