पुणे : कोरोनाचा (corona) वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) बैलगाडा शर्यतीच्या (Bullock Cart Race) परवानग्या नाकारल्या होत्या. तरीही पुण्यातील (Pune) खेडमध्ये (Khed) जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला (Decision) केराची टोपली दाखवत बैलगाडा शर्यत पार पडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परवानगी दिल्यांनतर पहिल्यांदाच पुण्यातील मावळ (Maval) आणि आंबेगाव (Ambegav) तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन (Organizing bullock cart race) करण्यात आले होते.

मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Increasing Corona) जिल्हाधिकाऱ्यांनी परवानग्या नाकारल्या आहेत. खेडमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसून शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

स्पर्धेमध्ये शंभरपेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

खेडमधील निमगाव खंडोबा (Nimgav Khandoba) येथे लपूनछपून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकडे पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परवानगी नसतानाही छुप्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजकांवर (Organizer) कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांवर कारवाई (Action) होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement