पुणे : बैलगाडाप्रेमींसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. बैलगाडा शर्यतीबाबत काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होती.
सुनावणीदरम्यान ॲड. मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीबाबत सुनावणी होणार आहे.
भाजपचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh landge) बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्यामूळे दोन दिवस दिल्लीमध्येच आहेत.
बैलगाडा शर्यतीबाबत बोलताना लांडगे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी बाजूमांडत आहेत.
बऱ्याच दिवसांनी एक तासापेक्षा अधिक वेळ सुनावणी झाली. बैलगाडा शर्यतीबाबत वकिलांनी चांगली बाजू मांडली. न्यायालयाने फार सहानुभूतीने आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
खिलारचे महत्व, ही जात शर्यतीची असल्याचे म्हणणेही यावेळी मांडण्यात आले. त्यामुळे आज यावर निर्णायक निकाल लागेल, अशी आशा आहे.
असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले आहे. मुकुल रोहतगी यांनी आपली बाजू मांडताना महाराष्ट्रालाच बैलगाडा शर्यतीबाबत का डावलले जाते असा युक्तिवाद त्यांनी केला.
यावेळी त्यांनी राज्यांच्या सीमांमुळे बैलांमध्ये कसा फरक पडू शकतो,असा मुद्दाही मांडला. सर्वोच्च न्यायालयाकडून ही सुनावणी हंगामी निकालासाठी पाच सदस्य खंडपीठापुढे सुनावणी होत नाही, तोपर्यंत अंतिम निकाल लागणार नाही,असे सांगण्यात आले.