पुणे – शासनाने सर्व खाजगी बस (Buses for Diwali) चालक- मालक यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दिडपटीपेक्षा अधिक भाडेदर आकारण्यास मनाई केली आहे. दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त हा निर्णय घेतला आहे.

दिवाळी सणाचा कालावधी सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस (Buses for Diwali) वाहतुकदारांनी विहीत दरानुसार भाडे आकारणी करावी.

आपले वाहन सुस्थितीत असल्याची तसेच वाहनाची सर्व कागदपत्रे वैध असल्याचीदेखील खात्री करावी व दंडात्मक कारवाई टाळावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायूवेग पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी खाजगी बसद्वारे प्रवास करताना तिकीट जादा दराने आकारण्याबाबत तक्रार असल्यास लेखी पुराव्यासह mh14prosecution@gmail.com या ई-मेल पत्त्यावर करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात.

तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यंदा राज्यभरात कहाणी संख्येने जादा (Extra Buses for Diwali Vacation) बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.